पिंपळे गुरव, दि. १( punetoday9news):-आमदार लक्ष्मण जगताप व चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात संजय गांधी समिती चिंचवड विधानसभा यांच्या कडून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालया मध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या 50 लाभार्थ्यांना विधवा तीस ज्येष्ठ नागरिक 10 मूकबधिर दोन अपंग 8 लाभार्थ्यांना पेन्शन पत्र व मिठाई देण्यात आली. या योजनेच्या
 लाभामुळे लाभार्थ्यांची दिवाळी गोड झाल्याचे समाधान लाभार्थ्यांनी व्यक्त केले. 

    त्यावेळी चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप म्हणाले की आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनात या समितीचे काम चालू असल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेणार्‍याची संख्या संपूर्ण महाराष्ट्रात चिंचवड विधानसभेची संख्या सर्वात जास्त आहे.  ही समिती या योजनेचा लाभ घेण्याची इच्छा असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी काम करण्यासाठी सदैव तत्पर आहे.

यावेळी चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख शंकर जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, संदीप गाडे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, संजय मराठे, दिलीप गडदे, टाटा मोटरचे कामगार प्रतिनिधी नामदेव शिंत्रे, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप, कुंदा गडदे, रवी खोकर,पंकज सारसर आणि माजी महापौर माई ढोरे आदी मान्यवर व लाभार्थी उपस्थित होते.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!