सांगवी,दि.२( punetoday9new):-  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि बाबुरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने १ व २ नोव्हेंबर दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आयोजित आंतर विभागीय मुलींच्या अंतिम सामन्यामध्ये पुणे जिल्हा क्रीडा विभागाने पुणे शहर विरुद्ध ८-१ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.


या आंतरविभागीय हॉकी स्पर्धेचे उद्घाटन डॉ.दिपक माने अधिष्ठाता व क्रिडा संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॅा. संजय गायकवाड, योगेश मुथय्या, डॉ. सुषमा तायडे, डॅा. शोभा शिंदे, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या मुलींच्या हॅाकी स्पर्धेमध्ये पुणे शहर विभाग, पुणे जिल्हा क्रीडा विभाग, नाशिक विभाग व अहमदनगर विभाग या ४ गटांनी सहभाग घेतला. यामध्ये अतिशय रंगतदार ठरलेल्या पुणे जिल्हा क्रीडा विभाग व पुणे शहर या अंतिम सामन्यांमध्ये पुणे जिल्हा क्रीडा विभागातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील सात खेळाडुंना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विवेक काळे व निखील जाधव तर निवड समिती सदस्य म्हणून डॉ. संजय गायकवाड, योगेश मुथय्या, डॉ. सुषमा तायडे यांनी काम पाहिले.
या विशेष यशाबद्दल सहभागी खेळाडुंचे महाराष्ट्र राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सर्व सन्मानिय पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळकृष्ण झावरे यांनी अभिनंदन केले असून सर्व स्तरातून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्राचार्य डॅा. बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. विद्या पाठारे तसेच सर्व क्रीडा समिती सदस्यांनी या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट संयोजन व आयोजन केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा. संतोष सास्तुरकर, प्रणित पावले, संतोष कुंभार, निलेश शिंदे, यांच्यासह बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पुणे विभागीय क्रीडा समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!