खडकी प्रतिनिधी(punetoday9news) – गणेश कांबळे

दिनांक २४/०६/२०२० रोजी सायंकाळी ५:२० वाजण्याच्या सुमारास शिवाजी मारुतीराव भोसले वय. ५५ वर्ष, राहणार, ५३/५४ भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे. हे रस्ता ओलांडून जात असतांना एका अज्ञात कार चालकाने सचिन फॅब्रिकेशन समोर मुंबई-पुणे रोड . बोपोडी येथे जोरदार धडक दिली होती त्यांचा काल उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

त्या प्रकरणात  श्रेयश भोसले वय १९, रा बोपोडी, पुणे. याने खडकी, पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून अज्ञात कार चालका विरुद्ध भा. दंड कलम २७९, ३३८, ३०४, (अ) ४२७, मोटर वाहन ॲक्ट १८४, १३२ (१), (क ) ११९/१७७, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस फौजदार संजय आढारी पुढील तपास करीत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!