पुणे, दि. ४(punetoday9news):- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत योजनांचा लाभ घेण्याकरिता १८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.
या नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना तसेच शैक्षणिक योजना, आरोग्यविषयक तसेच आर्थिक स्वरुपाच्या योजना राबवण्यात येत आहेत. यापैकी आर्थिक सहाय्य योजनांविषयी….
नोंदित बांधकाम कामगारांसाठी आर्थिक सहाय्य योजना:
• कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास ५ लाख रुपये एवढे आर्थिक सहाय्य.
• नैसर्गिक मृत्यू झाल्यास २ लाख रुपये आर्थिक सहाय्य.
• घरखरेदी किंवा घरबांधणीकरीता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील ६ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजाची रक्कम अथवा २ लाख रूपये आर्थिक सहाय्य.
• अटल बांधकाम कामगार आवास योजनेत (शहरी) व (ग्रामीण) पात्र बांधकाम कामगारांना मंडळामार्फत २ लाख रुपये अनुदान
• कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास १० हजार रुपये एवढी रक्कम अंत्यविधीसाठी मदत.
• पुरूष कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस प्रतीवर्षी २४ हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य.
• अधिक माहिती, नोंदणी, नूतनीकरण, लाभाचा अर्ज करण्याकरिता https://mahabocw.in या संकेतस्थळाचा वापर करावा.
संपर्क: अपर कामगार आयुक्त, बंगला क्रमांक-५, मुंबई-पुणे रोड, शिवाजीनगर पुणे- ५, दू. क्र. – ०२०-२५५४२६११/२५५४१६१७
Comments are closed