● सिंधुदुर्ग, पुरंदर, प्रतापगड, रायगड, राजगड , देवगिरी, सिंहगड , तोरणा या किल्ल्यांच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या हुबेहूब प्रतिकृती.

सासवड,दि. ६( punetoday9news):-  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत दि ३, ४ नोव्हेंबर २०२२ रोजी इ. ३ री , ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी किल्ला तयार करणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इ. ३ री , ४ थी च्या १२ गटांत १३५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग, पुरंदर, प्रतापगड, रायगड, राजगड , देवगिरी, सिंहगड , तोरणा या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या. किल्ला तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला. या किल्ल्यांची माहितीही विद्यार्थ्यांनी दिली.
परीक्षक म्हणून म. ए.सो. वाघिरे विद्यालय , सासवड येथील इतिहास विषयाचे अध्यापक शंकर विभाड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेचा निकालही घोषित करण्यात आला त्यात, इ. ३ री मध्ये गट क्र.४ – प्रथम, गट क्र. १ द्वितीय , गट क्र. ६ तृतीय आणि इ. ४ थी मध्ये गट क्र. १- प्रथम, गट क्र.६ – द्वितीय, गट क्र.२- तृतीय असे क्रमांक काढण्यात आले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड सर्व शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे नियोजन आशा ढगे, सुरेखा जगताप व सर्व शिक्षकांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला आहेरकर यांनी केले. परीक्षकांचा परिचय मंजुषा चोरामले यांनी करून दिला. तर आभार आशा ढगे यांनी मानले.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!