कार्यक्रम विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा – 

वाकड,दि.६(punetoday9news):-  बंजारा तांडा सांस्कृतिक एकता संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बंजारा गौरव पुरस्कार व चर्चा सत्र- २०२२ चे आयोजन वाकड येथे संतोष पवार आणि प्रिया पवार यांच्या प्रयत्नाने करण्यात आले होते.

“बंजारा अभिनव के नये पर्व कि शुरुवात’ या उद्घोषनेणे सामाजिक स्तर व विकास होण्यासाठी सर्व बंजारा समाज एकत्र व्यासपीठावर आला होता. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन नंतर “ बांजारा तांडा सौस्कृतिक एकता संघ “ या चळवळीच्या लोगो चे अनावरण झाले, बंजारा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी  बंजारा समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव गौरव गौतम, बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज, राष्ट्रपती यांचे अतिरिक्त खाजगी सचिव राजीव पाठक, माजी न्यायाधीश एन.के. चव्हाण, माजी उपसंचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय,पुणे, मोहन राठोड, भुलतज्ञ विभाग प्रमुख, ससून रुग्णालय डॉ. संयोगीता नाईक, गोपालन अनिष आचार्य, बंजारा तांडा सांस्कृतिक एकता संघ अध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष योगेश जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार यांनी बंजारा समाज हा कष्टकरी व अतिशय गरीब व मेहनतीने पुढे जात असल्याचे व इतर समाजप्रमाणे पुढे जाण्यासाठी शिक्षण व आपल्या बंजारा तांडया मधील एकजूट व शिक्षित करण्यासाठी प्रयत्न होण्याची व त्यासाठी सर्व बंजारा समाजाची गणना होण्याची गरज असल्याचे यावेळी आपल्या प्रस्तावनेत सांगितले.  यावेळी बंजारा समाजासाठी विविध महत्त्वाची उद्दिष्टे मांडण्यात आली त्यात आंतरराष्ट्रीय बंजारा समाजाला भारतीय बंजारा समाज आणि संस्कृतीशी जोडणे.राष्ट्रीय बंजारा तांडा जोडो अभियानाचा ठराव, भारतातील प्रत्येक राज्यात तांडाची संख्या मोजणी, संपूर्ण भारतातील तांड्यात स्थायिक झालेल्या बंजारा समाजातील लोकांची गणना, बंजारा समाजाचा शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न, बंजारा महिला सक्षमीकरणाला चालना देणे, बंजारा समाजाचा व्यावसायिक दर्जा वाढवणे, बंजारा समाजाच्या संस्कृतीचा आणि हस्तकलेचा देश-विदेशात प्रचार आणि प्रसार करणे, बंजारा समाज मागासलेल्या आणि अशिक्षित वर्गाला राज्य, कायदेशीर, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधा पुरवणे, बंजारा समाजाच्या सामाजिक स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर आणि आदर्श यांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या मुद्यावर चर्चासत्रात चर्चा करण्यात आली.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी पुरस्कार्थी  डॉ. रमेश राठोड, युवराज आडे, गायक जगदीश चव्हाण, राज चव्हाण, उमेश जाधव, कविता चव्हाण, रमेश चव्हाण, युवराज पवार, सुबोध पवार, डॉ कुणाल जाधव यांना शाल श्रीफळ, पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. समाजातील तळागाळात जाऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचाही सन्मान करण्यात आला , कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त बांजारा समाज युवा कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले, रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन तर अमोल पवार यांनी आभार मानले.

 

punetoday9news वरील इतर विडिओ पाहण्यासाठी – 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!