पुणे : आज (दि.२०)  रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना या नंतर लाॅकडाऊन होणार नसल्याचे  जिल्हाधिकारी नवल किशोर राम स्पष्ट केले.  पुणे व पिंपरीत शहरात १३ ते २३ जुलै असा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.या लॉकडाऊनमध्ये पहिले ५ दिवस अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात आली व काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांना माहिती देताना राम म्हणाले, लॉकडाऊन हा पर्याय वापरून कोरोना पूर्णपणे संपणार आहे असे कुणाही अधिकाऱ्यांचे मत नाही पण मागील काळात कोरोना रुग्णांची खूप झपाट्याने वाढत होती. ही वाढ नियंत्रणात आणण्यासाठी स्पीडब्रेकर आवश्यक होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
  या लॉकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे  यापुढे पुण्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन असणार नाही माात्र नागरिकांना शासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी काही नवीन प्रयोग आम्ही नक्की करणार आहे.

#

Comments are closed

error: Content is protected !!