सांगवी,दि.७(punetoday9new):-  नवी सांगवी येथील छत्रपती शिवाजी पार्क लेन नं. २ मध्ये एमएनजीएल गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

महापालिका तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सांगवी पिंपळे गुरव परिसरात मुख्य रस्त्यावरून एमएनजीएल कंपनीच्या वतीने गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र अंतर्गत रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाईपलाईन टाकण्याची कामे बाकी आहेत.
येथील अंतर्गत रस्त्यावर ६३ एमएम असणारी गॅस पाईपलाईन असून साधारण ४०० मीटर हुन अधिक लांब मुख्य गॅस पाईपलाईन रस्त्याच्या कडेने टाकण्यात येणार आहे. तसेच सोसायट्यांमधील फ्लॅट धारकांसाठी कनेक्शन देताना १२ एमएमची गॅस पाईपलाईन टाकून देण्यात येणार आहे. मुख्य पाईपलाईन टाकण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार असून सोसायटीतील फ्लॅटधारकांना कनेक्शन मिळण्यास एक महिन्याचा कालावधी लागेल. अशी माहिती याप्रसंगी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
नवी सांगवीतील छत्रपती शिवाजी पार्क लेन नं. २ मधील अंतर्गत रस्त्यावर दुतर्फा बाजूस असणारे आनंद पार्क, मिऱ्याकल क्लासिक, ओम रेसिडेन्सी, शंकराई पार्क, सूर्योदय अपार्टमेंट, जयराम पार्क, परदेशी रेसिडेन्सी, राज प्लाझा, बालाजी अपार्टमेंट व इतर रहिवाशी असणारे जवळपास पाचशे हुन अधिक फ्लॅट धारकांना एमएनजीएल गॅस पाईपलाईन कनेक्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे.

यावेळी उपस्थित नागरिकांनी माजी नगरसेवक नवनाथ जगताप यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून आभार व्यक्त केले.

दिवसेंदिवस कुटुंबातील दैनंदिन जीवनात महागाईमुळे खर्च वाढतच चालला आहे. त्यातच सध्या सिलेंडरचे दर देखीलही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे एमएनजीएल गॅस पाईपलाईन कनेक्शन घेऊन महिन्याचा २० ते ३० टक्के सिलेंडरचा खर्च कमी करू शकतो.
 – नवनाथ जगताप, माजी नगरसेवक


 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!