पुणे, दि. ८(punetoday9news):- डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित सौंदर्याचा रंग कोणता या ग्रंथाचे प्रकाशन शनिवार (दि.१२) रोजी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या हस्ते पुणे येथे संपन्न होणार आहे.
डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी सौंदर्याचा रंग कोणता हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांच्या हस्ते पुणे येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रसेवा समुहाचे संस्थापक अध्यक्ष राहुल पोकळे हे असणार आहेत. तर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राच्यविद्या अभ्यासक राजकुमार घोगरे, पत्रकार, लेखिका श्रुति गणपत्ये, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. संजय चौधरी, सांस्कृतिक प्रश्नांचे अभ्यास डॉ. संग्राम पाटील हे असणार आहेत.
तर प्रमुख पाहुणे म्हणून गिरीप्रेमी रविदादा ढमढेरे, जयहिंद शुगरचे गणेश माने देशमुख, इतिहास अकादमी सदस्य लहूआण्णा लांडगे, लोकप्रिय नेते बाबाराजे जाधवराव, डाॅ. दिपक बोधले, उदयोजक गणेश भरेकर उपस्थित राहणार आहेत.
सदरचा कार्यक्रम हा दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे येथे संपन्न होणार आहे.
Punetoday9news वरील इतर विडिओ पाहण्यासाठी.
Comments are closed