पिंपळे निलख, दि. ८( punetoday9news):- कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनांच्या काटेकोर अंमलजावणीबद्दल आभार मानणारी तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या देश सेवेप्रती महाराष्ट्रातील नागरिकानी त्यांचे धन्यवाद मानण्याचा अनोखा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून राबविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने शहरातून आतापर्यंत २ हजार आभार पत्रे पाठवण्यात आली.
भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्रदेश महामंत्री (सरचिटणीस) सुशिल मेंगडे, राष्ट्रीय चिटणीस गौरव गौतम यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहरातील कस्पटे वस्ती, वाकड भागातील नागरिकांनी २००० पत्र देऊन त्यांचे विचार आणि त्यांचे आभार नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचवण्याकरता पत्राच्या लेखी स्वरूपात सुपूर्त केले.
यावेळी प्रदेश सदस्य अजित कुलथे, पिंपरी चिंचवड युवा मोर्चा प्रभारी गणेशदादा वरपे, क्रीडा संयोजक जयदेव डेब्रा, पिंपरी-चिंचवड युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिपक नागरगोजे, तेजस्विनी कदम, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, संदिप नखाते, मोहित बुलानी, सनी बारणे, विक्रांत गंगावणे, दिगंबर गुजर, सुहास आढाव, अनिकेत शेलार, तेजस मुळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बहुतांश पत्रांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक करण्यात आले असून, कोरोनाकाळात आपल्या नेतृत्वात म्हणजेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वात देशातील नागरीकांसबतच ईतर देशातील नागरीकांना लसी उपलब्ध करून “वसुधैव कुटुंबकम” म्हणजेच सर्व जग आपल कुटुंब आहे हे दाखवुन दिले. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये भाजपच्या समर्थकांशिवाय काही सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. ही पत्रे संकलीत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी एकत्र आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत.
– संकेत चोंधे, शहराध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड.
Comments are closed