पुणे, दि. ९(punetoday9news):- पुण्याच्या प्रसिद्ध लक्ष्मी रस्त्यावरील इमारतींच्या बेसमेंट पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळा वापर करणाऱ्यांवर पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई करून सुमारे चार हजार चौरस फूट बांधकाम पाडले. या वेळी एक ब्रेकर, आणि चार गॅस कटरच्या साह्याने बांधकाम पाडण्यात आले. या वेळी महापालिका कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात होता.
बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन क्र सातच्या शाखा /कनिष्ठ अभियंता , उपअभियंता व आरेखक सहाय्यक यांच्या पथकाने बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास कारवाई सुरू केली.
मागील पंधरा दिवसात पालिकेने ट्युलीप इंजिनिअर्स यांचे सहाय्याने सिटी पोस्ट चौक ते अलका टॉकीज चौक दरम्यानचे सविस्तर सर्वेक्षण करून बेसमेंट, पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळा वापर करणाऱ्यांना नोटीसा बजावल्या होत्या. या भागात असणाऱ्या सात मिळकतींमधील दहा ठिकाणी इतर वापर असणाऱ्या मिळकतींना पुणे मनपाने नोटीसा बजावल्या होत्या. त्यावर आज पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या पथकाने कारवाई केली .
Comments are closed