पुणे दि.२१. ( punetoday9news): – कोरोना महामारीमुळे जवळपास सर्व स्थरातील नागरीकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. ह्या बिकट परिस्थितीचा विचार करून महावितरणने ही वीजबिले माफ करावित अशी मागणी उर्जामंञी नितीन राऊत यांच्याकडे विजय शिवतारे यांनी पत्राद्वारे केली आहे.
मार्च महिन्यानंतर बहुतांश ग्राहकांना मीटर रीडिंग न घेतल्याने महावितरण कडुन सरासरी वीजबिले आकारण्यात आली होती. नंतर जुन महिन्यात या तीन महिन्यांची बीले जारी केली. मागील बीलांची पडताळणी करून त्यात नव्याने समायोजन केले. याबाबत शिवतारे यांनी पञात उल्लेख करीत अनेक ग्राहकांना जुनची बिलेही अवास्तव आणि जादा आकारली असल्याचे सांगितले आहे. लाॅकडाऊन मुळे शेतकरी, कामगार वर्ग आर्थिक दृष्ट्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. त्यामुळे महावितरणने ग्राहकांची वीजबीले माफ करावी.
Comments are closed