पिंपरी, दि. १०( punetoday9news):- श्री सेवा आदिवासी महिला मंडळ पुणे व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्रीनगर काळेवाडी पिंपरी चिंचवड येथे (दि.9) रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमास उपस्थित महिलांना जागृती धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाविषयी माहिती, महिलांना होणारे फायदे संस्थेच्या अध्यक्षिका कल्पना सुपे यांनी दिली.
या कार्यक्रमात महिलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा. आत्मविश्वास निर्माण व्हावा, महिलांनी आपल्या निर्णय क्षमता कशा विकसित कराव्या याविषयी माहिती देण्यात आली.
उपस्थित महिलांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना या कार्यक्रमात उपस्थित राहून आमचा आत्मविश्वास वाढला आहे अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात 60 महिला बहिणी सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव कोमल सुपे यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना सुपे यांनी केले.
Comments are closed