आताची मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ठाण्यातील मॉलमधील मारहाणीप्रकरणी आव्हाड यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हर हर महादेव सिनेमावरुन वाद झाला होता. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. मुंबईला जात असताना पोलिसांनी आव्हाड यांना नोटीस घ्यायला बोलावलं होतं.
Comments are closed