पुणे, दि. १४(punetoday9news):- ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून सूरू झालेला वाद, जितेंद्र आव्हाडांची प्रेक्षकांना मारहाण व अटक हे प्रकरण ताजे असतानाच जितेंद्र आव्हाडांचं आज पहाटे सहा वाजता केलेल्या ट्विट मुळे महाराष्ट्रातील राजकारणातून नवीन घडामोडी घडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
काल कळवा येथील रस्त्याचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड हे एकाच मंचावर उपस्थित होते किंबहुना अगदी खेळीमेळीच्या वातावरणात मिश्किल टिप्पणी करत ते दिसून आले आणि त्यानंतर रात्रभरात घडलेल्या घडामोडीनंतर आज त्यांनी केलेले फार महत्त्वाचे मानले जात आहे त्यामुळे नक्की पडद्यामागे कोणत्या हालचाली घडल्या व अचानक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देण्यासंदर्भात वक्तव्य केले या चर्चांना उधान येणार हे नक्की.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पहाटे ६ वाजता ट्विट करत असे म्हटले आहे की, पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ?३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
Comments are closed