पुणे, दि. १४( punetoday9news):- “आमदार लक्ष्मण जगताप” यांच्या प्रेरणेतून व “शंकर जगताप” चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख यांच्या मार्गदर्शनात ‘ओमसाई फाउंडेशनचे’ अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व पेढे वाटून जयंतीच्या शुभेच्छा देत उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी आनंद खैराले,विशाल गोहेर,संतोष जगताप,राजबाबू सरकनिया,संतोष कोकीळ,
अर्जुन मेगवाल,चंपत सोलंकी,संजय घारे,रमेश गाडवे,केशव पांचाळ आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले लहुजी राघोजी साळवे हे भारताचे क्रांतीकारी होते त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर १७९४ रोजी पेठ, पुरंदर येथे झाला. लहुजींना युद्ध कलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषा कडून मिळाले होते. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराक्रमी पुरुष होते युद्ध कलेमध्ये ते पारंगत होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत होते. साळवे घराणे शस्त्र विद्येमध्ये निपुण व तरवेज होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहुजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्यांच्या उत्कृष्ट पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना “राऊत” या पदवीने गौरविले होते.
लहुजींच्या अंगी असलेले युद्ध कलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. 1822 मध्ये रास्तापेठ पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले व तिथे पुढील अनेक पराक्रमी क्रांतिवीर घडविण्यात आले.

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!