पिंपळे गुरव, दि. १४( punetoday9news):-  नवी सांगवीतील विनायक नगर येथे राहणाऱ्या प्रितेश साखरे या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणाचा मोबाईल फोन, पैशाचे पाकीट ललित म्हसेकर या तरुणाला मिळाले ते मोबाईलमधील फोन क्रमांकावर संपर्क साधत मित्रांच्या मदतीने तरूणास परत केले. 

या पाकीटात दोन तोळ्यांची सोन्याची साखळी, रोख रक्कम ३८५० व आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, एटीएम कार्ड अशी महत्वाची कागदपत्रे होती तसेच मोबाईलही होता. या हरवलेल्या वस्तूसह पाकीट परत मिळाल्याने प्रीतेश साखरे यांनी ललित म्हसेकर या तरूणाचे  आभार मानले.

आजकालच्या जगात लोक पैशांसाठी जवळच्या मित्रांना, नातेवाईकांनाही फसवतात मात्र माझ्यासारखा नागपूरहून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास आलेल्या तरूणासाठी हा अनुभव फार सुखद होता. माझे पाकीट व वस्तू सुखरूप परत मिळाल्याने मी ललित म्हसेकर यांचे मनापासून आभार मानतो. 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!