स्व. चंद्रकांत छाजेड आणि खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने मोफत पोलीस प्रशिक्षण “
खडकी,दि. १५( punetoday9news):-सदरक्षणाय खलनिग्रहनाय : या तत्त्वाने पोलीस खाते आपल्या देशांत काम करते आहे. या निमित्ताने देशसेवा करण्याची सर्वोत्तम संधी आहे.”असे प्रतिपादन कृष्णकुमार गोयल यांनी केले.
स्व.ऍड .चंद्रकांत छाजेड प्रतिष्ठान आणि खडकी शिक्षण संस्थेची क्रीडा प्रबोधिनी आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मोफत पोलीस भरती प्रशिक्षण ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी १६७ प्रशिक्षणार्थीनी नाव नोंदणी केली आहे.गोळा फेक, धावणे, स्टामिना वाढवणे तसेच परीक्षेचा अभ्यास कसा करावा तसेच लेखी परीक्षा व फिझिकल ची पूर्व तयारी कशी केली पाहिजे ?याबाबत विद्यार्थ्यांना या आठ दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन संस्थाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांचे शुभहस्ते झाले.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस खात्यांतर्गत विविध पदांची तपशीलवार माहिती देऊन पूर्वतयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बाळासाहेब हेगडे यांनी पोलिसभरतीबाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. स्व.ॲड चंद्रकांत छाजेड प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक कमलेश पंगुडवाले, अमर देशपांडे,धीरज गुप्ता,डॉ. महेश बेडभर, प्रा.संजय काटे, प्रा. प्रवीण मुरकुटे,आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक करून संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध खेळांची आणि क्रीडा प्रबोधिनी बाबत माहिती दिली. प्रा. संजय काटे यांनी सूत्र संचालन व आभार मानले.
Comments are closed