सासवड, दि. १७( punetoday9news):- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. शाळेत सगळीकडे फुगे लावले होते, रांगोळ्या काढल्या होत्या. कार्यक्रमात इ. १ ली, २ री च्या विद्यार्थ्यानी बालगीते सादर केली तसेच, इ. ३ री, ४ थी च्या विद्यार्थ्यांनी बालदिनाची माहिती सांगितली. शिक्षिका अश्विनी कदम यांनी देखील विद्यार्थ्यांना बालदिनाची माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध खेळणी आज खेळण्यासाठी ठेवली होती. विद्यार्थ्यांनी विविध खेळ खेळत आनंद व्यक्त केला आणि बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला आहेरकर यांनी केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed