पिंपरी,दि.१७( punetoday9new):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पुणे विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपा अध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीला पुणे विद्यापीठ विकास मंच सिनेट निवडणुकीचे समन्वयक राजेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महेश लांडगे आणि राजेश पांडे यांनी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना पिंपरी-चिंचवडमधून जास्तीत जास्त मते मिळावीत याबाबत नियोजन करण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला.
यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक शंकर जगताप , नितीन काळजे, राहुल जाधव, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सिनेट उमेदवार प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, राहुल पाखरे, पिंपरी चिंचवडमधील उमेदवार संतोष ढोरे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेश संयोजक राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजाभाऊ दुर्गे, ऍड. मोरेश्वर शेडगे, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे तसेच पक्षाचे सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका आणि सर्व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
Comments are closed