सांगवी (punetoday9news) :- सातत्याने मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात सकाळी कचरा उचलण्यासाठी येणाऱ्या गाडीवर लागणारी स्वच्छता विषयक गाणी सुद्धा मराठीतच लावण्याची मागणी केली आहे. ‘तो का करे भैय्या… गाडीवाला आया घरसे, कचरा निकाल’ अशी हिंदी गाणी लावून रोज सकाळी काय बिहारच्या जनतेला आवाहन केले जात आहे का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांना मराठीतून सर्व व्यवहार हवा आहे.  राज्यात कामकाजासाठी मराठी अनिवार्य असताना सर्रास हिंदी गाणी वाजवून महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेचा अपमान केला जात आहे.  त्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी सांगवी परिसरातील  संबधित गाड्यांवरचे स्पीकर काढले असून तसेच उद्यापासून परत हिंदी  गाणी वाजली तर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
स्वच्छ भारत अभियानाचे हिंदी गीत व इतर हिंदी ध्वनिफितांऐवजी मराठी भक्तिगीते किंवा इतर मराठी गाणी यापुढं लावण्यात यावी व मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करावा अशा आशयाच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू सावळे
पिं. चिं. शहर उपाध्यक्ष, विशाल पाटील, सुरेश सकट, गणेश माने, महेश केदारी, मंगेश भालेकर आणि इतर पदाधिकारी सहभागी होते.

Comments are closed

error: Content is protected !!