पिंपरी( punetoday9news):- वडार समाजाच्या मासिक ‘ओडर संदेश’ च्या पहिल्या महिला संपादक शांताबाई कल्याणराव जाधव (वय ७३) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच दु:खद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
वडार समाजात कल्याणराव जाधव हे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल. समाज सुधारणेच्या पहिल्या फळीतील कल्याणराव जाधव हे अग्रणी नाव होते. १९७६/ ७७ पासून त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिले होते. १९८५ च्या दरम्यान त्यांनी ‘ओडर संदेश’ हे मासिक सुरु केले. स्वतः महाराष्ट्रभर समाज जागृतीसाठी फिरत व मासिकाचे कार्य शांताबाई जाधव सावलीसारखे करत असत. काही वर्षापूर्वी कल्याणराव जाधव यांचे निधन झाले आणि त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यांची सावली शांताबाई जाधव या आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. परंतु त्यांच्या कार्याने त्या वडार समाजात कित्येक पिढ्या स्मरणात राहतील. वडार समाजाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा कल्याणराव जाधव व शांताबाई जाधव यांची नोद त्या इतिहासाला घ्यावीच लागणार आहे.
नुकताच ११ जुलै रोजी बंगळूरू येथील समाजबांधव व तेथील समाजाचे नेते शिवरुद्र स्वामी यांनी देशपातळीवरील ‘सावित्रीबाई फुले पुरस्कारा’साठी महाराष्ट्रातून शांताबाई कल्याणराव जाधव यांच्या नावाचा विचार केला होता. इतके त्यांचे कार्यकर्तृत्व होते.
Comments are closed