पुणे, दि.२३( punetoday9news):- राज्य उत्पादन शुल्क, तळेगांव विभाग पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत ८७ लाख ८९ हजार ५२० रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर, हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा रचून गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीच्या ट्रक क्र.एम एच ४६ एफ – ६१३८ या क्रमांकाचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली.

या ट्रकमध्ये रिअल व्हिस्की ७५० मि.ली चे ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की १८० मि.ली चे ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.ली चे ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण १ हजार २६७ खोके जप्त करण्यात आले. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये इतकी आहे. वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २४ वर्षे, रा. मु.पो. तांबोळे, ता. मोहोळ) व देविदास विकास भोसले (वय-२९ वर्षे रा. मु.पो. खवणी, मोहोळ जि. सोलापूर) यांना अटक करुन गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!