पुणे, दि. २४(punetoday9news ):- पुणे विभागातील सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न व्यवसाय करताना रोख पावती, देयकावर १४ अंकी नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक नमूद करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) हे आदेश दिले असून नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक नमूद न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ नुसार कारवाई घेण्यात येणार आहे. अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे पुणे विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी कळवले आहे.

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!