पुणे, दि. २५(punetoday9news):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपाच्या कालावधीत ग्रामीण भागातील ४० बस मार्गांवर पीएमपीएमएलद्वारे सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र आता या मार्गावर एसटी बस सेवा सुरळीतपणे चालू झाल्याने या मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे.
त्यानुसार ४० पैकी ११ मार्गांवर पूर्ववत वाहतूक सेवा सुरु केल्याने सदरच्या ११ मार्गांवरील सेवा उद्यापासून शनिवार (दि. २६) पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बंद होणारे मार्ग
स्वारगेट ते काशिंगगांव
स्वारगेट ते बेलावडे
कापूरव्होळ ते सासवड
कात्रज सर्पोद्यान ते विंझर
सासवड ते उरुळीकांचन
हडपसर ते मोरगांव
हडपसर ते जेजुरी
मार्केटयार्ड ते खारावडे / लव्हार्डे
वाघोली ते राहुगांव, पारगाव सालु मालू
चाकण, आंबेठाण चौक ते शिक्रापूर फाटा
सासवड ते यवत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संपाचे कालावधीत ग्रामीण भागातील ४० बस मार्गांवर पीएमपीएमएलद्वारे सेवा सुरु करण्यात आली होती. ४० पैकी ११ मार्गांवर पूर्ववत वाहतूक सेवा सुरु केल्याने सदरच्या ११ मार्गांवरील सेवा दि. २६/११/ २०२२ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे(1/2) pic.twitter.com/toJN1Ig6qs
— Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (@PMPMLPune) November 25, 2022
Comments are closed