● राज्यातील ५० शिक्षकांना गुणवंत शिक्षकांचा पुरस्कार देत होणार गौरव.
पुणे, ता. २६( punetoday9news):- महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्र सेवा समूह आणि रयत प्रकाशन यांच्या वतीने राज्यस्तरावरील गुणवंत शिक्षकांना ‘महात्मा फुले, सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती महात्मा फुले इतिहास अकादमीचे अध्यक्ष श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा पुरस्कार लेखक व नाटककार ज्ञानेश महाराव, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. सी. टी. कुंजीर, नानासाहेब भोसले, प्रा. सोमनाथ गोडसे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमंत कोकाटे म्हणाले, “महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला. उभयतांच्या विचारांनी, साहित्याने देशात सार्वजनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे त्यांच्या नावाने देशात शिक्षकदिन साजरा व्हावा, अशी प्रामाणिक भूमिका आहे.
दरम्यान, अशा आदर्शावर कार्य करणाऱ्या राज्यातील ५० शिक्षकांना गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार देत शिक्षणाच्या या कामासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
हा कार्यक्रम सोमवार (दि. २८) सकाळी साडेअकरा वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार आहे.
Comments are closed