पुणे, दि. २६( punetoday9news):-  मराठा आरक्षण, एसटी महामंडळ कर्मचारी आंदोलनामुळे नेहमीच वादग्रस्त चर्चेतील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सोलापूरमधील पत्रकार परिषदेत जोरदार राडा झाला.

सोलापूर येथे पत्रकार परिषद घेत असताना सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून शाई फेक करण्यात आली. सदावर्ते यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची मागणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. सोलापूरमध्ये ॲड. सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!