सांगवी, दि. २६( punetoday9news):- मुंबई वरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना सांगवी पोलीस स्टेशन व ओम साई फाउंडेशन यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी वीर शहीदांनी हा हल्ला परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले ” शौर्य,धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भ्याड हल्ल्यांना भीक न घालण्याची पोलिसांची परंपरा आहे. या हल्यावेळी पोलीस दलाने दाखविलेल्याया शौर्यामुळे सर्वाचे मनोधैर्य आणखी उंचावेल.”
यावेळी सांगवी पोलीस स्टेशन शांतता कमिटीचे संजय मराठे म्हणाले की “मुंबई वरील हल्ला हा भारताच्या आर्थिक राजधानी वरील हल्ला होता देशाच्या विकासाला खिळ घालण्याचा हा प्रयत्न होता. यामध्ये पोलीस तुकाराम ओंबाळे यांनी आतंकवादी कसाबच्या गोळ्या आपल्या छातीवर झेलून सुद्धा त्याला शेवट पर्यंत सोडले नाही त्यांच्या या पराक्रमाचे पोलीस दलातील शौर्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे.
या कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक सुनील तांबे, उपनिरीक्षक काळु गवारी, उपनिरीक्षक
संदिप खलाटे, शांतता कमिटीचे संजय मराठे, साई कोंढरे, पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, श्रीकृष्ण बनसोडे, राजेद्र सोनवणे, शशिकांत चव्हाण, विजय डहाळे, विजय शेलार, शशिकांत वाघुले, प्रमोद जराड, सुनिल जाधव, रेखा साबळे, महेश लोणकर, नितीन काळे, मिरा क्षिरसागर, विशाल चौधरी, विनोद साळवे, प्रदिप साबळे, अमित पांडे, विवेक गायकवाड, स्वप्नील शिंदे, संदिप काळेल, दादासाहेब हांगे, विनायक डोळस, विश्वनाथ असवले, जितेंद्र बावस्कर, अनिल देवकर, प्रज्वला बरवडे, मनिषा मोरे, भाग्यश्री भुजबळ पोलीस कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed