दापोडी,दि.२६ ( punetoday9news):-  दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिनाच्या पुर्व संधेला ( दि. 24 नोव्हेंबर ) ‘ आमचा विद्यार्थी आमचा अभिमान ‘ हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रशालेचे माजी विद्यार्थी व आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक डॉ. संजयजी साळवे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय दादासाहेब जगताप यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी प्राचार्या कल्याणी कुलकर्णी, पर्यवेक्षक रवींद्र फापाळे, सहसचिव हेमंत बगनर, सहाय्यक सचिव रामेश्वर होणखांबे, सर्व सहकारी शिक्षक ,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत व परिचय जगदाळे मॅडम यांनी केले . संविधानाचे वाचन संधान सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्राध्यापक साळवे यांनी विद्यार्थ्यांना मी कसा या प्रशालेमध्ये घडलो व अभ्यासाचे महत्त्व काय असते याविषयी मार्गदर्शन केले.

उपस्थितांचे आभार खरात मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख माकरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन गोडे मॅडम, शिंदे मॅडम व सर्व अध्यापक , सेवक अडागळे यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!