पुणे,दि. २९ (punetoday9new):- महात्मा ज्योतिराव फुले इतिहास अकादमी आयोजित राज्यस्तरीय महात्मा फुले सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून सुमारे साठ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने आज बालगंधर्व रंगमंदिर येथे सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी, ऍड. श्रीकांत शिरोळे, डॉ. पी. ए. इनामदार प्रमिला गायकवाड बळीराम बडेकर,डॉ. सुधाकर जाधवर डॉ. जयेश काटकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. सी.टी. कुंजीर यांनी भूमिका बजावली. तर डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी प्रस्ताविक सादर केले. त्यावेळी माजी खा. राजू शेट्टी यांनी शिक्षण क्षेत्रातील शालेय वयातील काही उदाहरणे सांगून शेतकऱ्यांच्या अस्मिता जागृत केल्या, तर प्रमुख पाहुणे ज्ञानेश महाराज यांनी भावी शिक्षक त्यांचे कर्तव्य आणि जबाबदारी यावर सविस्तर भाष्य केले. फुलांची शैक्षणिक संकल्पना आणि आधुनिक शिक्षण यातील फरक त्यांनी आपल्या परखड वाणीने उपस्थितांना सुनावला.
तत्पूर्वी कार्यक्रमाचा उद्देश आणि खरा शिक्षकदिन हा महात्मा फुल्यांचा स्मृतिदिन हाच असून तोच आपण साजरा केला पाहिजे.अशी भूमिका आपल्या प्रास्ताविकात डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी मांडली.
त्यावेळी ॲड.श्रीकांत शिरोळे,डॉ.पी.ए.इनामदार यांनीही आपली मनोगत व्यक्त केले.तसेच लहुजी लांडगे,रवींद्र ढमढेरे,प्रा.सोमनाथ गोडसे हे या कार्यक्रमाचे निमंत्रक होते.
सूत्रसंचलन प्रा.औदुंबर लोंढे व रमेश बांडे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.सारिका बहिरट यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकुमार घोगरे, विक्रमसिंह नलवडे,प्रा.सुहास नाईक,रमेश यादव,सतीश पाबळे,रोहित लांडगे, प्रा.रवींद्र शिंदे,अमोल चव्हाण,सयाजी कोकाटे,ऋतुराज पाटील,योगेश गायकवाड,प्रसाद पोकळे,संजय गवळी यांच्यासह महात्मा फुले इतिहास अकादमी,रयत प्रकाशन,गिरिप्रेमी ग्रुप व राष्ट्रसेवा समुहाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Comments are closed