हडपसर, दि. २९( punetoday9news):- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांनी भारतीय संविधान या विषयावर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच भारतीय संविधानाचे महत्त्व आणि भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान असून भारतीय संविधान सर्वात उत्कृष्ट संविधान मानले जाते. यामध्ये असलेले कलम,सूची अनुसूची याबद्दल विद्यार्थ्यांना विस्तृत असे मार्गदर्शन प्राचार्यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण जाधव प्रा.सनोबर काझी प्रा. शिवाजी बिबे प्रा. मयूर कोळेकर प्रा.सीमा वावरे प्रा. सुरभी तोलानी प्रा.संतोष सुतार,केतन पवार ,सुहास कानगुडे, आशुतोष कोलते,राजकुमार काटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!