(punetoday9news) खडकी प्रतिनिधी- गणेश कांबळे.
:- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ( बाल भारती ) पुणे. शैक्षणिक वर्ष २०-२१ वर्ष इयत्ता आठवीच्या पुस्तकातील प्रकरण दोन “माझ्या देशावर माझे प्रेम आहे.” लेखक यदुनाथ थत्ते यांनी शाहिद हुतात्म्यांचा एकेरी उल्लेख केल्याने थत्ते यांचा जाहीर निषेध करण्यात आला असून त्याविषयी निवेदन देण्यात आले आहे .
देशाच्या स्वातंत्र्याकरिता ज्या महान पुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. असे महान हुतात्मा पुरुष भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या नावा शिवाय वाक्य पूर्ण होत नाही. असे म्हटले जाते. इयत्ता ८ वी इतिहासाच्या इतिहासाच्या पुस्तकात प्रकरण दोन मध्ये हुतात्मा शहिद सुखदेव यांचे नाव वगळून लेखक थत्ते यांनी हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचा उल्लेख केल्याने, भावी पिढीला हुतात्मा सुखदेव कोण होते हे कळणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे
वंदेमातम संघटना खडकी यांनी आपल्या निवेदनात हुतात्मा भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या नावा प्रमाणेच हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांच्या सोबत फासावर गेलेल्या हुतात्म्यांचे सुद्धा नाव घेण्यात यावे उदा. हुतात्मा किसन सारडा, मलप्पा धनशेट्टी, आणि जगन्नाथ शिंदे यांची नावे घेण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. वंदेमातम संघटनेच्या वतीने याचा निषेध करीत, इतिहासाचे पुस्तक रद्द करावे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे, प्रांत कार्यध्यक्ष राजेश शर्मा, अध्यक्ष खडकी विभाग शिरीष रोच आणि इतर पदाधिकारी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
Comments are closed