सांगवी, दि. ५ ( punetoday9new):- दापोडी, जुनी सांगवी येथील प .पु.अवधूत बालयोगी श्री नंदकुमार महाराज संस्थापित श्री दत्त आश्रम आयोजित श्री दत्त जयंती नाम सप्ताह व संगीत महोत्सवात दुपारच्या सत्रात साई सरगम वाद्यवृंद,मुंबई प्रस्तुत आणि श्री अनंतदादा पांचाळ आणि सहकारी यांनी भक्तीगीते सादर केली.त्यास रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
सायंकाळच्या सत्रात निवृत्ति धाबेकर यांचे शास्त्रीय गायन झाले .त्यांच्या गायनाला रसिकांची विशेष दाद दिली.
पहिल्या सत्राची सुरुवात करताना त्यांनी राग दुर्गा मधील “सखी मोरी रूम झूम,,बादल गरजे बरसे” आणि ” माता भवानी, काली दुर्गा गौरी” ही झपतालातील बंदिश अतिशय बहारदारपणे सादर केली.त्यांनी खालील भक्तीगीते सादर केली.
‘आधि रचिली पंढरी, मग वैकुंठनगरी, दत्त दत्त , नाम स्मरता, दत्त दिगंबर माऊली, तव कृपेची साऊली, आवडे रूप, गोजिरे सगुण, भाई, सबके भाई.’ त्यांना तबल्यावर साथसंगत अरुण बोनकर, हार्मोनियमवर सुधांश धाबेकर, मृदंगावर चौरंगनाथ खांडेकर आणि तालवादयावर अजित घोरपडे यांनी केली.
दुसर्या सत्रात रामेश्वर डांगे यांनी राग मालकंस रागातील “जिन के मन राम के ” विलंबित एक तालात, आणि ” आज मोरे आईल बलम” तीन तालात बंदिश सादर केली.राग जोग मध्ये ‘तोम तेरे’ हा तराणा सादर केला. त्यांनी ‘दत्त माझा दीनानाथ’, ‘ अगा वैंकुठीच्या राया’ हे अभंग सादर केले.त्यानंतर श्रेयस डांगे यांनी ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारंमा’, एकला विठ्ठल’ ‘ अभंग सादर केले.त्यांना तबलासाथ अशोक मोरे, हार्मोनियमवर अमोल मोरे , तालवादयावर श्रेयस डांगे यांनी साथसंगत केली.आश्रमाच्या वतीने सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन अरविंद सुर्वे यांनी केले तर आभार तुकारामभाऊ महाराज यांनी मानले.
Comments are closed