कासारवाडी, दि.५( punetoday9news):-  पिंपरी-चिंचवड शहरातील कासारवाडी येथे श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात, दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. पहाटे काकडारतीपासून सुरुवात होत गुरू चरित्र ग्रंथांचे पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, दररोज कीर्तन सेवा अशा धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने पिंपळे गुरव-कासारवाडी परिसरातील वातावरण भक्तिमय आहे.

श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम कासारवाडी येथे दत्तजयंती निमित्त आमदार लक्ष्मण जगताप आणि मित्रपरिवार यांच्या वतीने सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तिसऱ्या दिवसाची किर्तनसेवा ह.भ.प.श्री. उमेश महाराज दशरथे (आळंदी) यांनी केली.

आजच्या कीर्तन सेवेत उमेश महाराज दशरथे यांनी भगवतगीता,देव या संकल्पनेचा भावार्थ आपल्या अभंगात उदाहरणे देऊन सांगितला.

या किर्तन सप्ताहामध्ये संत तुकाराम महाराज मंदिर, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर, मावळ येथे साकारत असलेल्या भव्य मंदिरासाठी सोहळ्यात आलेल्या विविध भाविकांकडून १६ लाख रुपयांची देणगी देण्यात आली. यात पोपटराव सोनावणे यांच्या वतीने रु. ११ लाख ११हजार १११ तर बबनराव येडे रु.१ लाख ११हजार १११,  सुशिला आनंदराव चौगूले १ लाख ११११,  विजयआण्णा गणपतराव जगताप १ लाख, प्रभावती दौलतराव कामठे रु. १ लाख, आणि आदित्य सुधाकर पवार, रंगनाथ गेणूजी हरिहर, सुर्यमान मुकुटराव कावगुडे, विशाल बाजीराव रोडें, शिवाजी भगवान मोरे, मृणाल सुरज बारटक्के, प्रदिप दत्तात्रय लोहार, प्रथमेश मोरे यांनी प्रत्येकी पाचशे रुपये देणगी दिली भंडारा डोंगर ट्रस्ट कडे सोपविण्यात आली.

आज या सोहळ्याला श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रमाचे शिवानंद स्वामी यांच्या समवेत पुणे शहराचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तसेच बाळासाहेब काशीद, माजी महापौर माई ढोरे, भाजप चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप,विराज आप्पासो रेणुसे, गिरीराज तानाजीराव सावंत, आरतीताई चोंधे, माधवी राजापुरे, उषा मुंडे, झेंडे अक्का, उज्वला गावडे, हभप प्रमोद महाराज पवार (युवा कीर्तनकार) , काळूराम इंगवले (प्रवचनकार), ह भ प दौलत कामठे, नितीन इंगवले, तुषार तरस, संजय जगताप, जयवंत देवकर, जीवन जाधव,स्वप्नील भोसले, देवदत्त लांडे , पांडुरंग ढमाले, जगनाथ नाटकपाटील आदी मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

Comments are closed

error: Content is protected !!