नाशिक (punetoday9news):- राज्यभर दूध उत्पादक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात दूध बंद आंदोलन झाले. या आंदोलनाचा नाशिक मध्ये प्रारंभ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वतःच्याच चिंचखेड , ता.दिंडोरी, नाशिक या गावातील पुरातन शिव मंदिरात दूध अभिषेक करून केला.
यावेळी जि.प.सदस्य भास्कर भगरे, उपसरपंच सुभाष मातेरे, किरण पाटील, संपत जाधव, दत्तू सोनवणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. “दुधाला पाच रुपये अनुदान द्या.. शेतकरी एकजुटीचा विजय असो ..राजू शेट्टी साहेब आगे बढो.” या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
विडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
यावेळी केंद्र शासनाने २३ जूनचा १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो३०रू. देण्यात यावे. दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा. पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकर्यांच्या खात्यावर प्रतिलिटर ५ रू. अनुदान जमा करावे. या प्रमुख मागण्या केंद्र व राज्य शासनाने पुर्ण कराव्या असे संदीप जगताप यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळणे गरजेचे आहे.असे जि.प.सदस्य भास्कर भगरे यांनी देखील सांगितले. गावातील दूध संकलन केंद्राचे संचालक सुभाष मातेरे, गणेश संधान, यांचे आभार मानण्यात आले
Comments are closed