पिंपरी, दि. ९( punetoday9news):- गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवीतील कृष्णा चौकात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून निवडणुकीतील विजयाचा आनंद साजरा केला.
भाजपने गुजरातमध्ये सलग सातव्यांदा विजय प्राप्त केला आहे. राज्याचा कारभार २७ वर्षे भाजपच्या हातात होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपला एँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, निकालात भाजपने गुजरातमध्ये राजकीय इतिहास घडवला आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी तब्बल १५६ जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा पिंपरी-चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनीही आनंदोत्सव साजरा केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवीतील कृष्णा चौकात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करत भाजपचा विजय साजरा केला. भाजपच्या ऐतिहासिक यशाबद्दल नागरिकांना पेढे वाटण्यात आले. या आनंदोत्सवात भाजपचे प्रभाग क्रमांक ३१ चे अध्यक्ष सखाराम रेडेकर, माजी नगरसेवक सागर अंघोळकर, बाळासाहेब देवकर, नवनाथ देवकर, संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे, गणेश बनकर, सुनील कोकाटे, प्रवीण पाटील, राजेंद्र येडे, सचिन सोनवणे, चेतन तारू, साई कोंढरे, उमेश झरेकर, शुभम फरांदे, अमित घोडसाळ, आदित्य मस्के, मनीष रेडेकर, अरुण गळदगे, भालचंद्र तरटे, अशोक बनकर, नरसिंह पाटील, शामराव पताडे, नामदेव भाकरे, एम. पी. चौगुले, जे. डी. पाटील, गणेश जुनवणे, प्रवीण जगताप, मदन तांदळे, राजेश शिंत्रे, प्रेमानंद रेडेकर यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Comments are closed