पुणे, दि. ९( punetoday9news):- औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी स. १० वा. प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर बनवणारी योजना आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचा आय. टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे सहा. सल्लागार (तां). यशवंत कांबळे व उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.
Comments are closed