पुणे, दि. ९( punetoday9news):- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हास्तरीय समिती बैठकीत जिल्ह्यातील खेड, जुन्नर व हवेली तालुक्यातील अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी गतीरोधक, रंबल स्ट्रीप्स बसविण्याची शिफारस करण्यात आली.
जिल्ह्यातील नारायणगाव जुन्नर मढ रस्ता राज्य मार्ग १११, जयहिंद महाविद्यालयाजवळ, जुन्नर शहर, पुणे खडकवासला रस्ता राज्य मार्ग १३३, केंद्रीय विद्यालय, डीआयएटी, केंद्रीय जल व विद्युत अनुसंधान शाळा, गोऱ्हे खुर्द, भांबोली आंबेठाण चाकण रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग-२०, जिल्हा परिषद शाळा वराळे, आंबेठाण, झित्राईमळा चाकण, ज्ञानवर्धनी शाळा चाकण, आदी शाळेच्या व अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी गतीरोधक, रंबल स्ट्रीप्स बसविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती कार्यकारी अभियंता तथा जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव रावबहाद्दूर पाटील यांनी दिली.
Comments are closed