पिंपरी, दि. १०( punetoday9news):- पिंपरी-चिंचवडमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली आहे. चंद्रकांत पाटील यांनी शाळा सुरू करण्यावरून नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेध केला.

आज दुपारी ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी येणार होते. त्यासाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चिंचवडमधील भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी ते चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा पाणी करून ते कार्यक्रमासाठी निघाले असता त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने थेट त्यांचा तोंडावर शाई फेक केली, चंद्रकांत पाटील हे पडता पडता राहिले. दरम्यान, उद्धव ठाकरे शिवसेना गटाने देखील कार्यक्रमाच्या स्थळाच्या जवळच आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांचा निषेध करण्यात आला होता. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे विद्यार्थी (NSUI) आक्रमक झाले होते. महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्यावरुन कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा करत भर रस्त्यात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबा फुले यांचे फोटो हातात घेतले होते. ते फोटो दाखवत त्यांना काळे झेंडे देखील दाखवले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!