पुणे दि.२१( punetoday9news) : – वंदेभारत या मिशन अंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात ४ जुलै २०२० पासुन सुरु झाली आहे. पुणे विभागामध्ये २१ जुलै २०२० अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून ४५७, दुस-या टप्प्यामध्ये ७८९ त्याचप्रमाणे तिस-या टप्प्यामध्ये २ हजार २९७, चवथ्या टप्प्यामध्ये १ हजार ७६५ अशा एकूण ५ हजार ३०८ व्यक्तींचे परदेशातून आगमन झालेले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील ४ हजार ३४६ सातारा जिल्हयातील २५७, सांगली जिल्हयातील २१८, सोलापूर जिल्हयातील २५६ तर कोल्हापूर जिल्हयातील २३१ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Comments are closed

error: Content is protected !!