नऱ्हे , दि. ११ ( punetoday9news):- स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, सामाजिक वनीकरण, नर्हे, स्वामीनारायण टेकडी येथे दर वर्षी लाइफ ट्री फोंडेशन चां वतीने झाडे लावून ती जगवली जातात . आता पर्यंत येथे पाच ते सहा हजार झाडे लावण्यात आली आहेत . काही ठिकाणी डोंगर उताराला सीसीटी करून वाहून जाणारे पावसाचे पाणी आणि मातीची धूप कमी करण्यात आली आहे. उन्हाळ्यात झाडांना पाण्याची गरज अधिक भासते . त्यासाठी वन विभागास येथे लाइफ ट्री ग्रुपने ५हजार लिटरच्या सोळा टाक्या दिल्या आहे.
आज उन्हाळ्यातील पहिला पाण्यचा टँकर लाइफ ट्री ग्रुप चा सहकार्याने मागवण्यात आला. या वेळी लाइफ ट्री फाउंडेशन चे संस्थापक संजय परोडकर, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष उमेद सुथार,भारतीय विद्यापीठ ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक सचिन दामने, पोलीस कांस्टेबल जाधव, ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनचे हवेली तालुका सचिव किशनाराम, मिडिया प्रभारी विक्रम सिंह या मान्यवरांचा उपस्थितीत टाक्या भरण्यात आल्या.
Comments are closed