हडपसर, दि. 17 ( punetoday9new):- शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विधी महाविद्यालयात सूर्यनमस्कार, अभिरूप संसद, रक्तदान शिबीर, पोस्टर प्रदर्शन,रांगोळी प्रदर्शन, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, चेस स्पर्धा घेण्यात आल्या .
उपक्रमांचे उदघाटन महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चे संचालक डॉ.भारतवाज आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील यांच्या हस्ते झाले.
विधी महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ,सांस्कृतिक व क्रीडा विभाग,राष्ट्रीय सेवा योजना या विभागांतर्गत विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आयोजन प्रा. किरण जाधव, प्रा. सनोबर काझी, प्रा.संतोष सुतार प्रा. सीमा वावरे प्रा. मयूर कोळेकर प्रा.सुरभी तोलानी यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments are closed