पुणे, दि. २२(punetoday9news):- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे यांच्यावतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन महिने कालावधीचे ‘सायबर सुरक्षा आणि डेटाबेस रिकव्हरी’ या विषयावरील मोफत प्रशिक्षणाचे आयोजन २६ डिसेंबर पासून करण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण अनिवासी हायटेक तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत होणार असून या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकमुनिकेशन पदवीधारक असावा अथवा उमेदवाराने समतुल्य संगणकाचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. प्रशिक्षणात संबंधित विषयाची तांत्रिक माहिती, उद्योजकता विकासाचा अभ्यासक्रम, उद्योग सुरु करण्याबाबतची माहिती, कर्ज प्रकरण, शासकीय अनुदान, प्रकल्प अहवाल, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ इत्यादी माहिती दिली जाणार आहे.
प्रशिक्षणासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी २४ डिसेंबर पर्यंत ९८२२०६८१६५ किंवा ९४०३०७८७६५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी मदन कुमार शेळके यांनी केले आहे.
Comments are closed