स्केल्स अँड टेल्स वाइल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन पुणे संस्थेच्या सदस्यांनी बिनविषारी भारतीय अजगरास सोडले नैसर्गिक अधिवासात.
चिखली,दि. २३( punetoday9new):- पिंपरी-चिंचवड मधील चिखली येथील नागरिकांकडून रस्त्याच्या मध्यभागी साप आल्याची माहिती स्केल्स अँड टेल्स वाइल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन पुणे संस्थेचे सदस्य ओंकार देशमाने यांना दिली.
संस्थेच्या सदस्यांनी वेळ न गमावता घटनास्थळी पोहोचून सापाला सुखरूपपने रेस्क्यु केले. हा साप हा साधारणपणे 3 ते 5 महिन्याचा लहान बिनविषारी भारतीय अजगर (indian rock python) ह्या जातीचा असून वनविभाच्या मार्गदर्शनाखाली लगेच त्या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वाढते शहरीकरण आणि जंगलतोडीमुळे वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, जीव हे आज लोकवस्तीमध्ये आढळून येत आहेत. जर अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला दिसून आल्यास तात्काळ 1926 ह्या क्रमांकावर संपर्क करून घटनेची माहिती वनविभागाला द्यावी किंवा 7276882656 ह्या क्रमांकावर संपर्क करून घटनेची माहिती आम्हाला द्यावी असे आवाहन स्केल्स अँड टेल्स वाइल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed