पुणे ( punetoday9news) दि. २१ :- जेजुरी शहरातील ग्रामदैवत जानाई मंदिराशेजारील जननीतीर्थ सोमवारी रात्री हजारो दिव्यांनी उजळले . दीप पूजेनिमित्त दरवर्षी येथे दिप प्रज्वलन केले जाते . ऐतिहासिक होळकर तलावाच्या शेजारी व जानाईदेवी मंदिरालगत असलेले हे जननीतीर्थविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.त्यापैकी म्हाळसाने येथे तप केल्याचे व गंगाही येथे अवतरल्याची आख्यायिका सांगितली जाते . उघडा मारुती मंडळ , श्रीराम आणि जननी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील विहिरी व तीर्थाची स्वच्छता करण्यात आली . जननीतीर्थाचीही स्वच्छता करण्यात आली . आषाढ अमावस्येनिमित्ताने दीप पूजेचे औचित्य साधून येथील जननी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येथे हजारो दिव्यांची आरास केली होती . जानाईदेवीच्या नव्या मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे . या तीर्थात परिसरातील नागरिक निर्माल्य सोडतात . त्यामुळे त्यातील पाणी दूषित होते . आपल्या घराप्रमाणे मंदिर व जननीतीर्थाची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी आपली असून परिसरात स्वच्छता राखावी असे आवाहन जननी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .
Comments are closed