पुणे, दि. २४( punetoday9news):- प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियानांतर्गत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत देण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण हे नि:शुल्क असून प्रशिक्षणाअंती उमेदवारांना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणांच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उमेदवारांना उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeYZvWQ9yqQesXUKr76jNK5eE0IswG6TLgACD4puRPSyVw4zQ/viewform या लिंकवर अर्ज करुन या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. याबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे या कार्यालयाशी संपर्क साधावा,
असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सा.बा मोहिते यांनी केले आहे.

 


 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!