मराठवाडा जनविकास संघातर्फे कार्यशाळेसाठी पुढाकार
पिंपरी,दि. २६( punetoday9news):-
मराठवाडा जनविकास संघ (महा.राज्य) संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी चिंचवड शहर, कृषी विभाग, बिक्कड ॲग्री टेक, विकासधारा ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आणि धारूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्तपणे ‘आंबा मोहोर संरक्षण आणि फळबाग व्यवस्थापन’ या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जागतिक आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, सेंद्रिय शेती तज्ज्ञ दिलीपराव देशमुख, सुरेश गायकवाड, जिल्हा कृषी अधीक्षक महेश तिर्थकर, आंबा बागायतदार संघाचे सहसचिव विश्वनाथ दहे, अशोकराव सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी बी.बी.जाधव, सरपंच बालाजी पवार, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपक आलुरे, श्रीकांत बिक्कड, टी. के. भंडारे, एस. जी. शिंदे, तुळजापूर पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, तसेच आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या कार्यशाळेत शेतकऱ्यांना या आंबा मोहोर संरक्षण आणि फळबाग व्यवस्थापन कसे करायचे, द्राक्ष बागेपेक्षा कमी खर्चात कमी व्यवस्थापनात शेतकरी केशर आंबा लागवड करून दुप्पट पैसा कमाऊ शकतो. उस्मानाबाद जिल्ह्यात केशर आंबा लावण्यास पोषक वातावरण आहे. किड व्यवस्थापन, आंबा मोहर फवारणी, अशी संपूर्ण माहिती सांगण्यात आली. दिलीपराव देशमुख, महेश तिर्थकर, सरपंच बालाजी पवार, अशोकराव सुर्यवंशी आदी मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले.
उद्योजक बालाजी पवार यांची धारूर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल धाराशिव येथील ग्रामस्थ ओंकार बाळासाहेब पाटील, अहिल्या बाळासाहेब पाटील, वाडी-बामणी ग्रामस्थ, धाराशिव जनता सहकारी बँकेचे शाखाधिकारी तानाजी भंडारी, सोलापूर वन विभागाचे मुख्य लेखापाल शरद शिंदे, टाटा मोटर्सचे कामगार नेते बबनराव चव्हाण, धारूर गावचे गणेश गुरव, महेश गुरव, अमृतवाडीचे प्रगतशील शेतकरी द्राक्षबागायतदार ज्ञानेश्वर जाधव, बागायतदार भागवत जाधव, धारूर मोर्डा येथील ग्रामस्थ तसेच शिवाजी पाडूळे, पिं.चिं. महापालिकेचे माजी नगरसेवक संतोष शिंदे, दत्त सेवा आश्रम ट्रस्ट कासारवाडी आदींच्या वतीने सत्कार करण्यात आला.
रत्नाकर खांडेकर, श्रीराम कदम, बालाजी गुरव, महेश गुरव, बालाजी पाटील, विशाल पवार, बाळासाहेब कोरे, अभिजित कामटे, सोमनाथ कोरे, धारूर गावकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन दयानंद शिंदे यांनी, तर आभार वृक्षमित्र अरूण पवार यांनी मानले.
Comments are closed