पुणे, दि. ३१( punetoday9news):-  मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था , जाधवर ग्रुप, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक प्रशांत आबणे यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले की, मानवी हक्कासाठी खुप महत्वपुर्ण कायदे असले तरी मानवी हक्कांचे संरक्षण केवळ कायद्यात तरतुद आहे म्हणून होणार नाही. त्यासाठी समाज हक्का बरोबरच कर्तव्याने जागृती व्हायला हवी. यासाठी ही मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था संस्था कार्य करीत आहे.

या कार्यक्रमात मानवाधिकार पुरस्कार दौंड तालुक्यातील राहू गावाचे सुपुत्र आणि क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असणारे प्रा. प्रशांत आबणे यांना मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी पानशेत धरणग्रस्त गावात केलेले कार्य, नेहरू युवा केंद्र संघटन, शिक्षक लोकशाही आघाडी, चर्मकार विकास संघ, माध्यमिक शिक्षक संघ, यश संस्था, इंटरविडा संस्था, मायक्रोसॉफ्ट अकॅडमी इत्यादी ठिकाणी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले.

ॲड. राजेंद्र म्हणाले की, जनहित याचिका या नागरीकांच्या मुलभूत मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विधि क्षेत्रात प्रमुख भुमिका बजावत असल्या तरी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाकडून होईलच असे होत नाही.त्यावेळी नागरिकांनी जागृत असायला हवे.

सदर पुरस्कार प्रदान सोहळ्यास डॉ .सुधाकरराव जाधवर (माजी व्यवस्थापन सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), शशिकांत बोराटे (उपआयुक्त पुणे), नामदेवराव जाधव (लेखक,वक्ते उद्योजक ) , ॲड गायत्री सिंग (जेष्ठ विधितज्ञ उच्च न्यायालय मुंबई), ॲड शार्दूल, डॉ यामिनी अडबे उपस्थित होते.

या पुरस्कारा मागील भावना मानवतेच्या दृष्टिकोनातून कार्य करीत असलेल्या मान्यवरांचा गौरव, सन्मानामागील भावना प्रगतीला व कार्याला स्फूर्तिबळ देण्याचीच आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!