पिंपरी, दि. ३१( punetoday9news):- माध्यमिक विद्यालय थेरगावचे रायफल शूटिंग स्पर्धेत ओपन रायफल शूटिंग प्रकारात एकूण आठ खेळाडू विद्यार्थ्यी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले असून स्पर्धेसाठी जाणाऱ्या सर्व विजयी खेळाडूंना कदम चंद्रशेखर माजी मुख्याध्यापक व अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते किट वाटप करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राळेगणसिद्धी रायफल शूटिंग रेंज अहमदनगर या ठिकाणी पुढील स्पर्धा संपन्न होणार आहे.
विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडू ( 19 वर्षाखालील मुले) 1.ओंकार गायकवाड, 2.आदिल अन्सारी, 3.अमन अंसारी
(19 वर्षाखालील मुली) 1. राधिका पुजारी, 2.मोनिका सोनवणे, 3.स्नेहल खाडे
(17 वर्षाखालील मुले) 1. भावेश कवळे
(17 वर्षाखालील मुली) 1.प्रज्ञा संगट
या एकूण आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजय रणझुंजारे राष्ट्रीय पंच यांनी सदर विद्यार्थ्यांना रायफल शूटिंगचे प्रशिक्षण मोफत दिलेले आहे .
यावेळी मुख्याध्यापक फुगे ए. व्ही. सायली गोरक्ष, सोनाली पाटील, सोनाली जाधव उपस्थित होते.
Comments are closed