पिंपरी(punetoday9news):- मटणाचा रस्सा सांडल्यानंतर वडील रागावले म्हणून दहा वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ( दि . २० ) रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मोरेवस्ती , चिखली येथे घडली . वेंकटेश लक्ष्मण पुरी ( वय १० , रा, श्रीकुंज हाऊसिंग सोसायटी , मोरेवस्ती- चिखली ) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे .
चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार , वेंकटेश हा महात्मा फुले इंग्लिश स्कूल आकुर्डी या शाळेत चौथीत शिकत होता . त्याचे वडील लक्ष्मण पुरी हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत तर आई धुण्या भांड्याची कामे करते . वेंकटेश याला तीन वर्षांनी लहान बहीण आहे . सोमवारी पुरी यांच्या घरी मटणाचे जेवण केले होते . जेवताना वेंकटेश याच्याकडून मटणाचा रस्सा सांडला . त्यामुळे त्याचे वडील त्याच्यावर रागावले . त्याचा राग वेंकटेश याच्या मनात होता.वेंकटेशने त्या रागातूनच मंगळवारी सकाळी वडील लक्ष्मण आणि आई आपापल्या कामासाठी निघून गेले असता टोकाचे पाऊल उचलले . घरी वेंकटेश आणि त्याची तीन वर्षाची लहान बहीण हे दोघेच होते . दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लक्ष्मण घरी आल्या असता वेंकटेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला . वेंकटेशच्या लहान बहिणीकडे चौकशी केली असता तिने सांगितले की , वेंकटेश याने बाथरूमच्या भिंतीवर चढून छताला ओढणीने स्वतःला लटकवून घेतले . पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . सहायक पोलीस निरीक्षक शाम म्हस्के तपास करीत आहेत
Comments are closed